धक्कादायक!खडसेंच्या मुलीवर गंभीर आरोप; पतीनंतर आता रोहिणी खडसेंही अडचणीत..


पुणे : पुण्यातील खराडी ड्रग्स पार्टी प्रकरणातील आरोपी असणारे प्रांजल खेवलकर यांच्या अडचणीत एकीकडे वाढ होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्या रोहिणी खडसे यादेखील अडचणीत अडकल्या असल्याची माहिती समोर आली आहे.पतीला वाचवण्यासाठी रोहिणी खडसे यांनी पुराव्याची छेडछाड केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. फक्त आरोपच नाही तर गुन्हा ही दाखल होऊ शकतो.

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर याला पोलिसांनी रेव्ह पार्टी करताना रंगेहात पकडले. यानंतर सातत्याने गंभीर आरोप करण्यात आली. पती प्रांजल खेवलकर याला चुकीच्या प्रकरणात अडकवले गेले आणि यामागे मोठे षडयंत्र असल्याचे रोहिणी खडसे यांनी म्हटले. फक्त हेच नाही तर पतीला वाचवण्यासाठी त्या थेट कोर्टात देखील पोहोचल्या. मात्र, खेवलकरला दिलासा मिळतच नसल्याचे स्पष्ट दिसतं आहे. आता पतीला वाचवण्यामध्ये रोहिणी खडसे यांनी पुराव्याची छेडछाड केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे.

सध्या पतीसाठी रोहिणी खडसे या जळगाव नाही तर पुण्यात तळ ठोकून आहेत. यादरम्यानच्या काळात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट गंभीर आरोप खेवलकर यांच्यावर केली होते. दरम्यान आता पती नंतर खडसेंच्याही अडचणीतही वाढ होणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!