ब्रेकिंग! मनोज जरांगे पाटील यांना मोठा धक्का, उपोषण करण्यास मनाई, नेमकं काय घडलं?

मुंबई : सध्या मराठा आरक्षणप्रश्नी मनोज जरांगे पाटील मुंबईकडे उद्या जाणार आहेत. असे असताना आता आझाद मैदान येथे आंदोलन करण्यास मुंबई हायकोर्टाकडून मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना मोठा धक्का मानला जात आहे. याबाबत ते काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नवी मुंबईत खारघर किंवा इतर ठिकाणी परवानगी देण्याची राज्य सरकारला मुभा असेल, असे मुंबई हायकोर्टाचे एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान निर्देश दिले आहेत. मुंबईत व्यवस्था विस्कळीत होऊ नये, यामुळे मुंबईतील आंदोलनाला परवानगी देऊ नये, असे निर्देश हायकोर्टाकडून देण्यात आले आहेत.
यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा उपोषण करणार असल्याची घोषणा करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी मुंबई हायकोर्टाने नाकारली आहे. यामुळे येणाऱ्या काळात वाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कोर्टाने हे निर्देश दिले असून, यामुळे मनोज जरांगे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. यामुळे
आता जरांगे पाटील आज काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक याबाबत आज त्यांची भेट घेण्यासाठी आले होते.
