घरात गणपतीची मूर्ती स्थापित करण्याआधी ‘हे’ १० नियम वाचाच, वास्तूशास्त्रात दडलंय महत्त्वाचं कारण…


नवी दिल्ली : हिंदू धर्मात गणपतीला प्रथन पूजनीय मानतात. कोणतंही शुभ कार्य करण्याआधी बाप्पाची पूजा करतात. गणपतीला विघ्नहर्ता म्हटलं जातं. यासाठीच घर असो किंवा ऑफिस प्रत्येक ठिकाणी गणपतीची मूर्ती किंवा फोटो लावतात. जेणेकरुन सर्व संकटांपासून मुक्ती मिळावी.

घरात बाप्पाची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवली की सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि संकटं दूर होतात, असा विश्वास आहे. मात्र वास्तूशास्त्रानुसार गणपतीची मूर्ती घरात कुठे, कशी आणि कोणत्या स्वरूपात ठेवायची याचे काही ठराविक नियम आहेत.

घराच्या मुख्य दरवाजाजवळ किंवा पूजेच्या स्थानी गणपतीची मूर्ती ठेवल्यास चैतन्य वाढतं आणि समृद्धीचा वास होतो. चुकीच्या पद्धतीने स्थापना केल्यास उलट मानसिक ताण, घरातील कलह आणि आर्थिक संकटं येऊ शकतात. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी हे नियम जाणून घेणं आवश्यक आहे.

तसेच वास्तूशास्त्रात गणपतीची मूर्ती बेडरूममध्ये किंवा घराच्या बाजूला ठेवणं अशुभ मानलं जातं. यामुळे दांपत्य जीवनात अनावश्यक वाद होतात. तसेच, अंधाऱ्या ठिकाणी किंवा अस्वच्छ जागी मूर्ती ठेवल्यास घरात नकारात्मकता वाढते. त्यामुळे मूर्ती नेहमी स्वच्छ, प्रकाशमान आणि पवित्र ठिकाणीच स्थापित करावी.

घराच्या मुख्य दरवाजात मूषक वाहनासह गणपतीची प्रतिमा ठेवली तर घरात प्रवेश करणाऱ्याला सकारात्मक ऊर्जा मिळते, असं वास्तूशास्त्र सांगतं. त्यामुळे गणेश मूर्तीची दिशा आणि स्वरूप निवडताना काळजी घेणं महत्त्वाचं आहे.

घरात वाममुखी गणपतीची मूर्ती ठेवणं शुभ मानलं जातं. यामुळे घरात शांती आणि प्रगती नांदते. परंतु दक्षिणमुखी गणपतीची पूजा वेगळ्या पद्धतीने करावी लागते. नियम न पाळल्यास त्याचे परिणाम प्रतिकूल होऊ शकतात.

विशेष इच्छा असलेल्या लोकांसाठी वेगवेगळ्या स्वरूपांचा उल्लेख केला आहे. ज्या दांपत्यांना संतानप्राप्ती हवी असेल त्यांनी बालगणेशाची मूर्ती घरात ठेवावी. करिअर आणि व्यवसायात यश मिळवण्यासाठी शेंदूर लावलेल्या गणपतीची प्रतिमा फायदेशीर मानली जाते. त्यामुळे आपल्या गरजेनुसार आणि वास्तूशास्त्रानुसार योग्य मूर्तीची निवड करणे आवश्यक आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!