प्रांजल खेवलकरांचा पाय आणखी खोलात ; आक्षेपार्ह व्हिडिओ फोटो समोर, 8 महिलांचा धक्कादायक दावा..

पुणे : पुण्यातील रेव्ह पार्टीवर छापा टाकून माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल केवळकर यांच्यासह इतर काही जणांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आता या खराडी पार्टी प्रकरणामुळे प्रांजल खेवलंकर यांचा पाय आणखीनच खोलात गेला आहे.पुणे पोलिसांनी कोर्टातही खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये अश्लील आणि आक्षेपार्ह व्हिडिओ असल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता सात ते आठ महिला पुणे पोलिसांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्यावरवर आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,प्रांजल खेवलकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई असून, खराडी पार्टी प्रकरणामुळे ते चर्चेत आले आहेत. सुमारे ७-८ महिलांनी खेवलकर यांच्याकडे आक्षेपार्ह व्हिडिओ, फोटो आणि ऑडिओ रेकॉर्डिंग असल्याचा दावा केला आहे. पोलिसांनी कोर्टात खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ आणि चॅट असल्याचे सांगितले आहे. णखी महिलांकडून तक्रारी आल्यास प्रांजल खेवलकर यांच्यावर नवीन गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.
प्रांजल खेवलकरने संबंध ठेवताना या महिलांची सहमती नसताना, चोरून ऑडिओ रेकॉर्डिंग केलेय. त्याचं बरोबर आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटोज देखील पोलिसांना मिळून आले आहेत. आक्षेपार्ह व्हिडिओ, फोटो आणि ऑडिओ रेकॉर्डिंग असणाऱ्या महिलांपैकी 7 ते 8 महिलांनी पोलिसांशी संपर्क केल्याची माहिती मिळाली आहे. सदर महिला भयभीत झाल्या असून, पोलिसांकडे मदतीसाठी संपर्क करत असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी आता आणखीनच वाढणार आहेत.
