मोठी बातमी! भाजप आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर गोरक्षकांचा हल्ला, पुण्यात घडली धक्कादायक घटना…

पुणे : पुण्यात गोरक्षकांकडून आमदार सदाभाऊ खोत यांना धक्काबुक्की करण्यात आली आहे. पुण्यातील द्वारकाधीश गोशाळेजवळ ही घटना घडली. आमदार सदाभाऊ खोत यांनी गोरक्षकांबद्दल एक वक्तव्य केलं आणि त्यानंतर आक्रमक होत गोरक्षकांनी त्यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला.

पुण्यातील फुरसुंगी येथे द्वारकादास गौशाळेत ठिकाणी आमदार सदाभाऊ खोत हे कार्यकर्त्यांसोबत गेले होते. त्याचवेळी कार्यक्रमात घुसून गोरक्षकांनी खोत यांच्यावर हल्ला चढवला. तिथे हजर असलेल्या पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला.
गेल्या काही दिवसांपासून सदाभाऊ खोत हे गोरक्षकांविरोधात आवाज उठवित आहेत. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहून कथित गोरक्षकांना आव्हान देत आहेत. हीच गोष्ट गोरक्षकांना खटकल्याने त्यांनी पुण्यात सदाभाऊ खोत यांच्यावर हल्ला चढवला. जर सत्ताधारी पक्षातील आमदारावर हल्ला होत असेल तर कायदा सुव्यवस्था राहिलीये कुठे? असा प्रश्न विचारला जात आहे.

म्हशी गोशाळेतून गायब झाल्याचा मुद्द्यावरून सदाभाऊ खोत आणि शेतकरी आक्रमक झाले होते. पोलिसांना बरोबर घेऊन आम्ही जनावरे ताब्यात घेण्यासाठी गेलो होतो. मुद्देमाल शेतकऱ्यांच्या ताब्यात द्यावा, असा न्यायालयाचा आदेश आहे.
आम्ही पोलिसांना विचारलं की इथे एकही म्हैस नाही आता तुम्ही आम्हाला काय देणार आहात? त्याचवेळी माझी न्यूज १८ लोकमतवर मुलाखत सुरू होती. त्याच समयी काही गुंडांनी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील प्रसंग टळला, असे सदाभाऊ खोत यांनी हल्ल्यानंतर सांगितले