मुंबईत महानगरपालिका निवडणुकीआधी भाजपची मोठी खेळी, थेट अध्यक्षच बदलला, नवीन नावाची केली घोषणा…


मुंबई : सध्या सर्वच राजकीय पक्षांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. पुढच्या काही महिन्यात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लागू शकतात. त्या पार्श्वभूमीवर आज भाजपकडून महत्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. प्रदेश भाजपकडून आज नव्या मुंबई भाजप अध्यक्षाची निवड करण्यात आली आहे.

यामध्ये अमित साटम यांना मुंबई भाजपच अध्यक्ष बनवण्यात आलं आहे. साटम मुंबई उपनगरातून येतात. अमित साटम हा भाजपचा आक्रमक आणि अभ्यासू चेहरा म्हणून ओळख आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित होते. मागच्या अनेक वर्षांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेच वर्चस्व होतं.

आता शिवसेनेत फुट पडली. दोन गट झाले. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्यासाठी मुंबई महापालिका जिंकणं सोप राहिलेलं नाही. दोन्ही ठाकरे बंधुंचा जनाधार मोठ्या प्रमाणात घटला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालातून हे स्पष्ट झालं. त्यामुळे मुंबईत आपली ताकद टिकवून ठेवण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधु एकत्र येऊन निवडणुका लढवू शकतात.

याबाबत सध्या चर्चा सुरु झाली आहे. मुंबई पालिकेवर आपला झेंडा फडकवायचा हे भाजपच जुनं स्वप्न आहे. आज मुंबईत भाजपचे बुहसंख्या आमदार आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीपासून मुंबईत भाजपचा जनाधार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. भाजपसमोर यंदा ठाकरे बंधुंच आव्हान असू शकतं. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यंदा एकत्र येऊन निवडणूक लढवू शकतात.

मुंबई भाजप अध्यक्षपदासाठी दोन नावांची चर्चा होती. अमित साटम आणि प्रवीण दरेकर. अमित साटम हे विधानसभेचे आमदार आहेत, तर प्रवीण दरेकर हे विधान परिषदेतून आमदार आहेत. यामुळे आता भाजपने जोरदार तयारी केली असून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडून देखील बैठका सुरु झाल्या आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!