मोठी बातमी! लाडक्या बहिणीचां ऑगस्ट अन सप्टेंबरचा हप्ता एकत्र जमा होणार?

पुणे : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा महायुती सरकार सत्तेत आणण्यात मोलाचा वाटा ठरला आहे. आतापर्यंत जुलै महिन्यापर्यंतचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत.आता ऑगस्टचा हप्ता कधी येणार याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, ऑगस्ट महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. अजूनही ऑगस्टच्या हप्त्याबाबत कोणतीही माहिती माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे आता ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर जात आहे. लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांना पुढच्या महिन्यात पैसे दिले जात आहेत. दरम्यान, या महिन्यातदेखील हप्ता पुढे जाणार का असा प्रश्न विचारला जात आहे. आणि जर हा हप्ता लांबणीवर गेला तर दोन महिन्याचे पैसे एकत्र येऊ शकतात. दरम्यान, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
लाडकी बहीण योजनेत महिनाअखेर किंवा सणासुदीच्या दिवशी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातात. आता येत्या गणेश उत्सवाच्या काळात महिलांना ऑगस्ट सप्टेंबरचा हप्ता एकत्र मिळणार असल्याची चर्चा आता होत आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.. त्यामुळे हप्ता कधी येणार याकडे बहिणींच्या नजरा लागून राहिले आहेत.
