राजकीय हालचालींना वेग ; शरद पवारांच्या खासदाराने घेतली पंतप्रधान मोदींची भेट, कारण काय?

पदाधिकारी पक्ष प्रवेश करत आहेत. अशातच आता शरद पवार गटाच्या एका खासदाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलं आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघाचे शरद पवार गटाचे खासदार अमर काळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. नेमकी भेट कशासाठी झाली याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, वर्धा लोकसभा मतदारसंघातीस विकास कामांबाबत अमर काळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असल्याचे समोर आले आहे. अमर काळे यांनी सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली आहे.पंतप्रदान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर ट्वीट करत अमर काळे यांनी म्हटले की, ‘आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी वर्धा लोकसभा मतदारसंघ विकसित करण्याच्या व रोजगाराला चालना देण्याच्या दृष्टीने राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या ग्रामोद्योगाच्या विचारांवर आधारित देशातील एकमेव संस्था असलेल्या महात्मा गांधी ग्रामीण औघोगिकिकरण संस्थाच्या सर्वांगीण विकासाकरिता व संस्थेच्या विस्तारीकरणाकरिता लक्ष केंद्रित करण्याची मागणी केली असल्याच त्यांनी म्हटल आहे.
दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना शरद पवार गटाच्या आमदाराने पंतप्रधानाची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.
