‘उरुळीकांचन’ ला रंगला भव्यदिव्य दहिहंडी सोहळा ! अखिल तळवाडी मित्र मंडळाची दहिहंडी सिध्देश्वर गोविंदा पथकाने फोडली….

उरुळी कांचन, (पुणे) : पूर्व हवेलीतील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेली उरुळी कांचन (ता. हवेली) येथील आखिल तळवाडी मित्र मंडळाची दहीहंडी शनिवारी (ता. 16) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सिद्धेश्वर गोविंदा पथक पिंपळगाव (ता. दौंड) या पथकाने ही दहीहंडी फोडली. यावेळी दहीहंडी फोडून पारितोषिक प्राप्त केले.
सलग 21 वर्षांपासून आखिल तळवाडी मंडळ दहीहंडी उत्सवाचे आयोजन करीत असून सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांमुळे मंडळाने गावात वेगळी ओळख निर्माण केली आहे. मंडळाचे मार्गदर्शक माजी उपसरपंच सुनील (बापू) कांचन यांच्या मार्गदर्शनाखाली, तर युवा नेते अनिल (आण्णा) कांचन व अध्यक्ष ओंकार रानवडे यांच्या प्रयत्नातून यंदाचा कार्यक्रम यशस्वी झाला. यावेळी उपस्थित गोविंदानीं डीजेच्या तालावर ठेका धरीत जोरदार जल्लोष साजरा केला.
विद्युत रोषणाई, मंत्रमुग्ध करणारे संगीत, आकर्षक सजावट आणि हजारो तरुण-तरुणी, महिला वर्ग तसेच बालगोपाळांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे दहीहंडीला वेगळीच रंगत आली. बालगोपाळांसह गोंविदाचा उत्साह शिगेला पोहोचला होता. तसेच ढगाळ हवामानामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन वातावरण अल्हाददायक झाले होते.
या सोहळ्यास शिरूर-हवेलीचे आमदार माऊली कटके, उरुळी कांचनच्या सरपंच ऋतुजा कांचन, यशवंतचे अध्यक्ष सुभाष जगताप, दिलीप वाल्हेकर, हवेली तालुका राष्ट्रवादी महिला अध्यक्षा चारुशीला कांचन, राजेंद्र बापू कांचन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तर मंडळाच्या वतीने भरत काळे, संदीप कुंजीर, आप्पा रानवडे, ईश्वर कोतवाल, प्रवीण जुन्नरकर, अक्षय बंटी कांचन, अभिमन्यू रावडे, निलेश कांचन, सुशांत कुंजीर, जयेश कांचन, मयूर कुंजीर, आदेश कांचन, राजेंद्र काळे, रोहित बोराटे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
दरम्यान, या दहीहंडी सोहळ्याला उरुळी कांचन परिसरातील हजारो गोपाल भक्तांनी उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवली. तसेच उरुळी कांचन पोलिस प्रशासनाने परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता