पुणे हादरलं ; 9 दिवसाच्या बाळाला सोडून आई बेपत्ता ; पोलिसांकडून शोध सुरू..

पुणे : पुण्यातील वाघोली परिसरातील 24 वर्षीय विवाहित महिला आपल्या 9 महिन्याच्या बाळाला सोडून बेपत्ता झाली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या महिलेचा पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पूजा खंबाट असं बेपत्ता झालेल्या महिलेचे नाव आहे. कुणालाही न सांगता ही महिला घरातून बाहेर जाताना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे नुकताच तिची डिलिव्हरी झाली होती.पूजा हिला 9 दिवसांचं बाळ असून तिचं सी-सेक्शन झालं होतं. पूजाचे टाके देखील काढले नसल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसापासून पुणे शहरात महिला मिसिंग होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल असून या महिलांचा शोध पुणे पोलिसांना लागत नसल्याची माहिती समोर येत आहे. समोर आलेल्या आकड्यांनुसार, 2022 मध्ये पुणे जिल्ह्यातून 840 महिला गायब झाल्या होत्या.तर 2024 अल्पवयीन मुलींसह तरुण आणि तरुणीही गायब होत झाल्याने खळबळ उडाली होती. विविध पोलीस ठाण्यात या मिसिंगच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या… अशी देखील माहिती समोर येत आहे.