पुण्यात मद्यधुंद चालकानं चक्क डीसीपीच्या गाडीलाचं ठोकलं ; दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात..

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात मद्यपान करून गाडी चालवण्याच्या आणि अपघाताच्या मोठ्या घटना समोर येत आहेत, अशातच आता पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क ट्रँफिक डिसीपी हिम्मत जाधव यांच्या गाडीलाच ठोकल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील केशवनगरमध्ये काल (शुक्रवारी, ता 15) राञी दहा ते साडे दहा वाजण्याच्या सुमारास मद्यधुंद चालकाने वाहतूक डिसीपी हिम्मत जाधव यांच्या गाडीला धडक दिली.या अपघातात डीसीपींची मुलगी किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर दोन आरोपींना मुंढवा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुंढवा पोलिसात मद्यधुंद चालकांविरोधात ड्रँक अँड ड्राईव्ह अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क ट्रँफिक डिसीपीच्या गाडीला धडक दिल्याने कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.