खडसेंचें जावई प्रांजल खेवलकरांच्या अडचणी वाढल्या ; ‘या ‘प्रकरणी दुसरा गुन्हा दाखल…

पुणे : पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणी अडचणीत आलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेच्या तक्रारीनंतर आणखी एक गुन्हा सायबर पोलिसांनी दाखल केला आहे. लपून व्हिडीओ काढल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी आणखीनच वाढल्या आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुणे सायबर पोलिस ठाण्यात प्रांजल खेवलकर यांच्याविरोधात आलेल्या एका महिलेच्या तक्रारीनंतर त्यांच्यावर नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेवलकर यांनी चोरून शारिरीक संबंधाबद्दलचे व्हिडीओ काढून त्याचा गैरवापर करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करण्यात आला होता. याच प्रकरणात आता गुन्हा दाखल केला होता. त्यांच्यावर माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66E आणि भारतीय न्याय संहिता कलम 77 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पार्टी प्रकरणाच्या पहिल्याच गुन्ह्यात खेवलकर यांना जामीन मिळाला नाही. अशातच आता दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे खेवलकर यांचा पाय खोलात गेला आहे.
दरम्यान महिलेने खेवलकर यांच्यावर अधिकृतरित्या तक्रार दाखल केल्यानंतर सायबर पोलिसांनी खेवलकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे आता खेवलकर यांचा मुक्काम काही दिवस जेलमध्येच असण्याची शक्यता आहे.