पुण्यात ड्राय डे तरीही मध्यरात्री पार्ट्या ; 8 ते 10 पबवर कारवाई..

पुणे : पुण्यात ड्राय डे असतानाही एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नामांकित पबमध्ये मध्यरात्री १५ ऑगस्टनिमित्त ड्राय डे असूनही रात्री दीड वाजेपर्यंत मद्य विक्री सुरू असल्याचं आढळून आलं.याची माहिती मिळताच राज्य उत्पादन शुल्क विभाग तसेच पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेन 8 ते 10 पबवर संयुक्त धडक कारवाई केली आहे
मिळालेल्या माहितीनुसार, १५ ऑगस्टनिमित्त भारतभर ड्राय डे असतो. मात्र, पुण्यात ड्राय डेचं उल्लंघन करण्यात आलं. पुण्यातील पब रात्री दीड वाजेपर्यंत चालू होते. तसेच पबमध्ये रात्री बारानंतरही मद्यविक्री सुरू होती. याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभाग तसेच पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर त्यांनी धाड टाकून कारवाई केली.आकाई, मीलर्स, बी एच के, गेम पलासियो, बॉलर यांसारख्या प्रसिद्ध पबवर कारवाई करण्यात आली आहे. पबवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान पुण्यातील विविध पबविरोधात रात्री बारानंतर मद्य विक्री केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पुण्यातील कल्याणी नगर विमान नगर तसेच बंडगार्डन परिसरातील अनेक नामांकित पबवर कारवाई करण्यात आली आहे.