महायुतीत वादाची ठिणगी ; ‘लाडकी बहीण योजना ‘अजित पवारांची ; बड्या नेत्याचा दावा…

पुणे : महायुती सरकार सत्तेत आणण्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजना गेमचेंजर ठरली. या योजनेवरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली. त्यानंतर आता अजित पवार यांनी ‘लाडकी बहीण’ योजना आणल्यानेच राज्यात महायुतीला २३८ जागा मिळाल्या,’ असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केला आहे. तटकरे यांच्या या वक्तव्यावरून महायुतीत पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महायुतीला यश मिळाल्याचे अधोरेखित करत योजनेचे सर्व श्रेय उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांना दिले. ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ५० टक्के जागा महिलांसाठी असतील’, असेही त्यांनी नमूद केले आहे.गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून या योजनेबाबत चुकीची माहिती देखील पसरवली जात आहे.. लाडकी बहीण योजना तात्पुरती असल्याचा दावाही काही नेत्यांनी केला आहे.
सध्या देशात गाजत असलेल्या मतदार यादींच्या विषयावरही बोलताना तटकरे यांनी मतदार यादीमध्ये काही घोळ नाही. यादीवर सूचना हरकती मांडण्यास वेळ मिळतो,राजकीय पक्षांना त्यासाठी पुरेसा वेळही दिला. परंतु गेल्या काही दिवसापासून विरोधकाकडून पुन्हा एक नवे फेक निगेटिव्ह पसरण्याचा प्रयत्न होत आहे असेही त्यांनी म्हटले आहे.