पुण्यात अपघाताचा थरार ; टेम्पोची दुचाकीला धडक, चाकाखाली चिरडून तरुणाचा जागीच मृत्यू…

पुणे : गेल्या काही दिवसांपासून शहरात अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. अशातच आता पुण्यातील कात्रज चौकात भरधाव टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कात्रज चौकामध्ये सकाळी आठच्या सुमारास दुचाकीस्वाराला भरधाव टेम्पोने चिरडलं आहे. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तरुणाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या अपघाताचा तपास कात्रज पोलिस करत आहेत.
Views:
[jp_post_view]