‘फिल्म ऑफ द मिलेनियम’ ‘शोले’ला @50 वर्ष पूर्ण; भारतीय चित्रपट विश्वाला शिरतेजावर नेणारा चित्रपट अजूनही ‘अजरामर’…


उरुळीकांचन : भारतीय चित्रपटाचा इतिहास शोले शिवाय पूर्ण होऊच शकत नाही. सुमारे 50 वर्षांपूर्वी हा सिनेमा पडद्यावर झळकला होता. भारतातील सर्वात प्रसिद्ध, लोकप्रिय हिंदी सिनेमांमध्ये शोलेची गणना केली जाते. 50 वर्षापूर्वी आजच्याच दिवशी म्हणजेच 15 ऑगस्ट 1975 ला शोले फिल्म रिलीज झाली. दिग्दर्शक रमेश सिप्पी होते. लेखक सलीम-जावेद यांच्या जोडीनं शोले सिनेमाची पटकथा आणि डायलॉग लिहिले आहेत.

अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमामालिनी, जया भादुरी, संजीव कुमार आणि गब्बर सिंगची अविस्मरणीय भूमिका करणाऱ्या अमजद खान यांच्यासारख्या कलाकारांमुळे हा सिनेमा अजरामर झाला आहे. शोले सिनेमानं पाश्चात्य आणि समुराई (जपानी) क्लासिक सिनेमांपासून प्रेरणा घेतली होती. शोले पिक्चर 15 ऑगस्ट 1975 ला घोड्यांवर टापा टाकत रिलीज झाला. पाहिल्याचं आठवड्यात पिक्चर फ्लॉप, डिजास्टर, डेड! सगळीकडे पिक्चरची खिल्ली उडवली जाऊ लागली. चेष्टा, मस्करी आणि ट्रेड पेपर्सची धार वाढत चालली होती. गब्बर सिंगचे कुचेष्टेचे कार्टून प्रसिद्ध होऊ लागले. ‘ए तो छोले है” असे म्हणत लोकं टिंगल करत होते. सिनेमा समीक्षक यांनी तर ‘हिंदी सिनेमाच्या आत्म्याशी विश्वासघात’ घोषित केले. ‘अत्यधिक मसाला, लेकिन इमोशंस की कमी’ अशी चर्चा व्हायला लागली. इंडिया टुडे’ मासिकानं या चित्रपटाचं वर्णन ‘बुझे हुए अंगारे’ असं केलं होतं.

दिग्दर्शक रमेश सिप्पी यांना वाटले आपण भारतीय प्रेक्षकांची नस ओळखण्यात कमी पडलो, कदाचित अमिताभ बच्चन म्हणजेच जयचा मृत्यू हा प्रेक्षकांना आवडलं नसणारं म्हणुन शेवट बदलण्यासाठी पुन्हा शूटिंगसाठी एक्टर्सला बोलविण्यात आले, स्टूडियो तयार आणि अचानक सलीम-जावेद यांचा हथियार टाकण्यास नकार दिला. थोडी वाट पाहूयात असे या जोडीने सुचविले. दुसर्‍याच दिवशी त्यांनी हा पिक्चर 1 कोटी कमवेल अशी अतिशयोक्ती पूर्ण पान जाहिरात पेपर मध्ये दिली. त्यावर देखील विनोद व्हायला लागले. पण दुसरीकडे दुसर्‍या आठवड्यात मुंबई मधील गल्ली गल्लीत एक चिंगारी उठली.

कॉलेज मुलांमधे ‘कितने आदमी थे?’, हा डायलॉग गाजायला लागला. ‘जो डर गया, समझो मर गया’ असे सर्वच डायलॉग देशातल्या कानाकोपऱ्यात गाजू लागले. माहौल पलटून टिकट्स गायब, ब्लैक-मार्किट, मिडनाइट शो हाऊसफुल्ल! पिक्चर भारताच्या नसा नसात भिनला. मग काय अद्भुत, महागाथा! विशेष म्हणजे जय या भूमिकेच्या रोल साठी अमिताभ बच्चन हे पहिली पसंती नव्हती. शत्रुघ्न सिन्हा यांची निवड करण्यात आली होती परंतु धर्मेंद्र याच्या आग्रहाखातर अमिताभ बच्चन यांना हा अजरामर रोल देण्यात आला.
‘शोले’ एक सांस्कृतिक ब्लॉकबस्टर होती.

मिडल ईस्ट साहित ग्लोबल चित्र पाहिल्यास शोलेचे ग्रॉस कलेक्शन अभूतपूर्व 35 करोड रुपये राहिले. आर.डी बर्मन यांचं जबरदस्त संगीत आणि टाळ्या मिळवणारे सिनेमातील डायलॉग यामुळे तब्बल पाच लाख रेकॉर्ड्स आणि कॅसेट त्याकाळी विकले गेले. आजच्या इनफ्लेशन हिशोबाने 3000 कोटींची कमाई, जगभरात 25 करोड प्रेक्षकांनी पाहिलेला पहिला पिक्चर, 60 थिएटरला 50 आठवडे तर 100 पेक्षा जास्त थिएटरला 25 आठवडे, पाहिलाच 70mm पिक्चर, मुंबईच्या मिनर्वा थिएटर मध्ये लागोपाठ ऐतिहासिक 5 वर्ष, रिकॉर्ड 286 आठवडे शो, खर्चाच्या 1616% प्रॉफिट असे अनेक रेकॉर्ड शोलेच्या नावावर प्रस्थापित झाले. हिंदी सिनेमाच्या भाषेत सांगायचं झाले तर ‘शोले’ हमेशा एक ही थी, एक ही रहेगी. भारत की नसों में ‘शोले’ दौड़ती है. भारतीयांच्या मनातील ‘शोले’चा सूर्य कधी मावळणार नाही.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!