खेकडे पकडायला गेले ते परतलेच नाही, बाप-लेकाचा दुदैवी मृत्यू, मुंबई येथील घटनेने हळहळ…

मुंबई : पावसाळ्याचे खेकडे पकडायला गेलेल्या बाप-लेकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना कांदिवली पूर्वेच्या रामनगर परिसरात घडली आहे. या घटनेने एकच खळबळ माजली आहे.

एकनाथ पाटील (वय. ५०) आणि वैष्णव पाटील (वय.१२) असे या बाप लेकाची नावे आहेत. या प्रकरणी कुरार पोलिसांनी एडीआरचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तलावात खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या १२ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. त्याला वाचवण्यासाठी त्याच्या वडिलांनीही तलावात उडी मारली. मात्र पोहता येत नसल्याने दोघांचाही मृत्यू झाला. कुरार पोलिसांनी एडीआरचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

कांदिवलीच्या क्रांतीनगर परिसरात राहणारे पाटील बाप लेक संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील रामगड येथे शनिवारी खेकडे पकडण्यासाठी गेले होते. दुपारी १२.३० च्या सुमारास वैष्णव पाटील हा तलावात खेकडे पकडायला उतरला होता. पण त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला.
दरम्यान आपल्या मुलाला बुडताना पाहून एकनाथ पाटील वडिलांनी तलावात उडी मारली होत. मात्र एकनाथ पाटील यांना देखील पोहता येत नसल्याने त्यांचा देखील बुडून मृत्यू झाला होता.