पुणे हादरलं ; चुलतीला प्रपोज केल्याचा राग…. हॉकी स्टिकने मारहाण करत तरुणाची हत्या ; दोघांना अटक..


पुणे : विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यात गेल्या काही दिवसापासून गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अशातच आता एका व्यक्तीने आपल्या सख्ख्या पुतण्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चुलतीला आय लव्ह यू म्हणाल्यामुळे संतापलेल्या चुलत्याने तरुणाला संपवलं आहे. पुण्यातील चंदनगरमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,साईनाथ उर्फ खलीबली दत्तात्रय जानराव (वय ३५ वर्षे) असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. मृत साईनाथ यांनी चुलतीची छेड काढली होती एवढेच नव्हे तर तिला ‘आय लव यू’ असेही म्हटले होते. याचाच राग मनात धरून
सोन्या उर्फ आदित्य संतोष वाल्हेकर आणि समर्थ उर्फ पप्पू शर्मा यांनी साईनाथला हॉकी स्टिकने जोरदार मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या साईनाथला तेथेच सोडून आरोपी निघून गेले मात्र घाव लागल्याने साईनाथचा घटनास्थळीमृत्यू झाला.

दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत साईनाथचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. त्यानंतर चंदननगर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. पोलिस सध्या या प्रकरणाच तपास करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!