राज्याच्या राजकारणात खळबळ! शरद पवार यांची उच्चस्तरीय चौकशी होणार? भाजपच्या बड्या नेत्याची महत्वाची माहिती..

मुंबई : दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठा दावा केला होता. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधी 2 माणसं मला भेटायला आली होती. ते मला विधानसभेच्या 288 जागांपैकी 160 जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होते, असा दावा पवार यांनी केला होता. यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती.

असे असताना या विधानाची अद्याप सर्वत्र चर्चा सुरू असतानाच आता शरद पवार यांची उच्चस्तरीय चौकशी करा अशी मागणी भाजप आमदाराने केली आहे. यामुळे सगळेच हादरले आहेत. शरद पवार हे देशाच्या राजकारणातील मोठं नाव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून सगळे नेते त्यांचा अनेकदा आदर करताना दिसून येतात.
आता त्यांच्या चौकशीची मागणी केल्याने एकच चर्चा सुरु झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत बंब यांनी ही मागणी केली असून उच्चस्तरीय चौकशीसाठी निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार असंही त्यांनी सांगितलं. शरद पवार ईडी कडे जसे स्वतःहून गेले तसंच या चौकशीला शरद पवार यांनी स्वत:हून सामोरं जावं असे त्यांनी म्हटले आहे.

याबाबत ते म्हणाले, शरद पवार यांनी जो दाव केला होता, त्यानंतर बंब यांनी हे विधान करत पवारांच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. शरद पवार यांनी नागपूरमधील पत्रकार परिषेदत मोठा गौप्यस्फोट करत खळबळ उडवली होती. त्यांच्या पत्रकार परिषदेआधी काही दिवस काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मत चोरीचा बॉम्ब टाकल्याने देशातील वातावरण बदलले आहे.
बंब म्हणाले, मला वाटतं, त्यांची एक उच्चस्तरीय चौकशी झालीच पाहिजे. या उच्चस्तरीय चौकशीसाठी निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार असल्याचा खुलासाही त्यांनी केला. शरद पवार ईडी कडे जसे स्वतःहून गेले तसे या चौकशीला शरद पवार यांनी जावं असंही बंब म्हणाले. शरद पवार यांच्याबरोबर राहील गांधी यांच्याही कार्यालयाची चौकशी करावी, यामुळे आता राजकीय वातावरण तापले आहे.