संबंध ताणले, अमेरिकन अर्थव्यवस्थेवर मंदीचे संकट, ट्रम्प यांच्या टॅरिफ निर्णयामुळे नेमकं घडतंय काय?


नवी दिल्ली : डोनाल्ड ट्रम्प यांनी ५० टक्के टॅरिफ लागून भारताला मोठा धक्का दिला. यामुळे भारत आणि अमेरिकेचे संबंध ताणले गेले आहेत. हेच नाही तर काही देशांनी भारताला पाठिंबा दिलाय. अमेरिकेतील नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डोनाल्ड ट्रम्प यांच्या अटी न मानण्यास सांगितले आहे.

अमेरिका भारतावर दबाव टाकण्याचे काम करत आहे. टॅरिफ विरोधात अमेरिकेतही संतापाचे वातावरण सध्या बघायला मिळत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या निर्णयामुळे भारत आणि अमेरिकेतील संबंध बिघडण्याची शक्यता आहे.

मूडीज या आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्थेच्या विश्लेषणानुसार, अमेरिकेत महागाईचा भडका उडालेला आहे. अन्नधान्याच्या वाढत्या किंमती, वाढलेली घरभाड्याची दर, आणि कामाच्या संधींच्या अभावामुळे नागरिक त्रस्त आहेत.

सर्व्हेनुसार, सुमारे ९० टक्के अमेरिकन नागरिक सतत महागाईच्या दबावाखाली आहेत. याच दरम्यान ट्रम्प यांचे टॅरिफ धोरण जाहीर झाले असून, त्यामुळे अनेक वस्तूंच्या किंमती आणखी वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, कार उद्योगावरही या टॅरिफचा थेट परिणाम होत असून, काही कंपन्यांनी यावर आपली चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, उत्पादन खर्च वाढल्यामुळे ग्राहकांवर आर्थिक भार येईल. ट्रम्प यांच्या या धोरणामुळे केवळ भारतच नव्हे तर अमेरिकेतील सामान्य नागरिकही आर्थिक अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!