आता फक्त १२७९ रुपयांत देशांतर्गत आणि ४ हजारात परदेशात हवाई प्रवास, Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या…

मुंबई : Air India Express ने एक खास ‘फ्रीडम सेल’ सुरू केला आहे. याअंतर्गत, फक्त १,२७९ रुपयांपासून तुम्ही देशांतर्गत आणि ४,२७९ रुपयांपासून आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास करू शकता. यामुळे ही ऑफर फायदेशीर आहे. भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त हीऑफर असणार आहे. ही ऑफर ठराविक काळासाठी असणार आहे.
याबाबत माहिती अशी की, सवलतीच्या दरात बेस फेअर, कर, विमानतळ शुल्क यासारखे शुल्क समाविष्ट नसतील. प्रवासी अधिकृत वेबसाइट किंवा मोबाइल अॅप्लिकेशनवरून ऑनलाइन तिकिटे बुक करू शकतात. नेट बँकिंगद्वारे पेमेंट केल्यास एक्सप्रेस लाइटच्या भाड्यावर ‘शून्य’ शुल्क आकारले जाईल. यामध्ये तिकीट रद्द केल्यास रक्कम परत केली जाणार नाही.
‘फ्रीडम सेल’ अंतर्गत तुम्ही १९ ऑगस्ट २०२५ ते ३१ मार्च २०२६ पर्यंतच्या प्रवासासाठी बुकिंग करू सकता. मात्र, ही सवलत मिळवण्यासाठी तुम्हाला १५ ऑगस्टपर्यंत बुकिंग करावे लागेल. ही ऑफर १० ऑगस्ट पासून अधिकृत वेबसाइट (www.airindiaexpress.com) आणि एअरलाइनच्या मोबाइल अॅपवर सुरू झाली आहे.
यामध्ये ११ ते १५ ऑगस्ट दरम्यान इतर प्रमुख प्रवास बुकिंग प्लॅटफॉर्मवर देखील हे उपलब्ध असेल. यामध्ये मर्यादित जागा असल्याने प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर तिकिटे उपलब्ध आहेत. सवलतीच्या जागा बुक झाल्यानंतर फ्लाइट बुकिंगवर नियमित शुल्क लागू होईल. अधिकृत वेबसाइटनुसार, ‘गौरमायर’ हॉट मील, केबिन आणि एक्स्ट्रा चेक-इन बॅगेज आणि एक्सप्रेस अहेड सारख्या सेवांवर २० टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे.
दरम्यान, फ्रीडम सेल’ अंतर्गत एअर इंडिया एक्सप्रेस देशांतर्गत उड्डाणांसाठी किमान १,२७९ रुपये आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी किमान ४,२७९ रुपये भाडे आकारत आहे. तसेच, इतर अनेक फायदे देखील मिळतील. यामुळे ही एक फायदेशीर ऑफर असून याबाबत संधीचा फायदा घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.