नवनीत राणा यांच्या हत्येचा कट, ८ आरोपींचा सहभाग, एकाला ठोकल्या बेड्या..

अमरावती : माजी खासदार नवनीत राणा यांना व्हिडिओद्वारे शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आता अमरावती शहर क्राइम ब्रँचच्या पथकाने मुख्य आरोपीला छत्तीसगडमधून अटक केली आहे.
दरम्यान, या अटकेनंतर आमदार रवी राणा यांनी गंभीर आरोप करत, नवनीत राणा यांच्या हत्येचा कट रचला गेला होता आणि त्यात आणखी ८ ते १० आरोपी सामील असल्याचा दावा केला आहे.
व्हिडिओद्वारे धमकी देणारा आरोपी गजाआड माजी खासदार नवनीत राणा यांना धमकावल्याच्या प्रकरणात क्राइम ब्रांचने ही मोठी कारवाई केली आहे. ज्या इसमाने व्हिडिओद्वारे नवनीत राणांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली होती, त्या मुख्य आरोपीला पोलिसांनी छत्तीसगडमधून अटक केली आहे.
याप्रकरणी पुढील तपास सुरू असून, पोलीस या कटाच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. या अटकेनंतर आमदार रवी राणा यांनी गंभीर आरोप केले. नवनीत राणा यांच्या हत्येचा कट रचला गेला होता आणि त्यासाठी बैठका झाल्या होत्या, असा दावा त्यांनी केला.
दरम्यान, या कटात अटक केलेल्या आरोपीव्यतिरिक्त आणखी ८ ते १० जण सामील असल्याचा त्यांचा आरोप आहे. धमकी देणारे हे सर्व मुस्लिम तरुण असल्याचेही त्यांनी सांगितले.