आता शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी हक्क परिषद!! राजू शेट्टी यांच्यासह शेतकरी नेते एकत्र येत केला मोठा एल्गार….


पुणे : येथे राज्यातील विविध शेतकरी संघटनांच्या शेतकरी प्रतिनिधींची शेतकरी हक्क परिषद घेण्यात आली. देशभरातील शेतकरी व विविध शेतकरी संघटना कर्जमाफी व किमान हमीभाव या दोन मुद्यावर एकत्रित येवून लढा उभारणे गरजेचे असल्याचे मत यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले आहे.

यावेळी बोलताना ते म्हणाले, याआधी देशभरातील २५० हून अधिक शेतकरी संघटना किमान हमीभाव कायद्यासाठीच्या लढाईत एक झाले आहेत. महाराष्ट्रातील सुरू झालेली लढाई देशपातळीवर गेल्यास शेतकऱ्यांना न्याय मिळणे सहज शक्य आहे. कृषीप्रधान देशात सरकारचे धोरणामुळे शेतकरी आत्महत्या वाढत आहेत.

महाराष्ट्रात दर आठ तासाला १ शेतकरी आत्महत्या होवू लागले आहेत. अस्मानी व सुल्तानी संकटापुढे शेतकरी हतबल झाला आहे. जागतिक बाजारपेठेत होणाऱ्या आयात- निर्यात धोरणामुळे शेतकरी रसातळाला जाऊ लागला आहे. यामध्ये शेतकऱ्यांना सुरक्षा कवच असणे गरजेचे आहे. असेही राजू शेट्टी यांनी सांगितले आहे.

तसेच देशातील शेतकऱ्यांची संपुर्ण कर्जमुक्ती करून किमान हमीभावाचा कायदा संसदेत मंजूर केल्यास देशातील शेतकऱ्यांना पुन्हा कर्जमाफीची आवश्यकता लागणार नाही. शेतकरी कर्जमाफी करिता केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांची दिशाभुल केली आहे. राज्य सरकारमधील मंत्री व लोकप्रतिनिधी यांनी शेतकरी कर्जमाफी हा चेष्टेचा विषय केला आहे.

राज्यातील शेतकरी संघटनानी विशीष्ट मुद्यावर एकत्रित येवून लढाई तीव्र केल्यास राज्य सरकारला याबाबत निर्णय घ्यावा लागेल. यावेळी प्रहारचे प्रमुख बच्चू कडू, आमदार कैलास पाटील, आमदार बाबासाहेब देशमुख, कॅा. अजित नवले, राजेंद्र कोरडे, अनिल घनवट, ॲग्रोवनचे निवासी संपादक रमेश जाधव यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!