धक्कादायक! प्रियकरांसोबत मिळून पत्नीने पतीचाच काढला काटा, पत्नीस अटक तर 2 आरोपी फरार..

मुंबई : मुंबईतील आरे कॉलनीतील पत्नीने प्रियकरासोबत मिळून आपल्या पतीचाच काटा काढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.प्रियकरानं प्राणघातक हल्ला केल्यामुळे प्रेयसीच्या नवऱ्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तपास करीत आरोपी महिलेला ताब्यात घेतलं आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राजश्री अहिरे (वय वर्ष ३५) असे आरोपी महिलेचं नाव आहे. तिचा पती भरत लक्ष्मण हा मेकअप आर्टिस्ट आहे. राजश्री ही चंद्रशेखर पडयाची या व्यक्तीच्या प्रेमात अखंड बुडाली होती. मात्र, तिच्या रिलेशनशिपमध्ये पती अडसर ठरत होता. पत्नीच्या अफेअरची भरतला माहिती समजल्यानंतर तिने राजश्रीला विचारणा केली. मात्र त्यानंतर तिने प्रियकराला फोन लावला. भरत आणि राजश्री दोघेही चंद्रशेखरला भेटण्यासाठी गेले. यावेळी चंद्रशेखरने त्याच्यावर हल्ला चढवला. चंद्रशेखरनं भरतच्या छातीवर, पोटावर आणी शरीराच्या इतर भागांवर ठोसे मारण्यास सुरूवात केली.त्याच्यासोबत रंगा नावाचा व्यक्तीही उपस्थित होता. चंद्रशेखर जेव्हा भरतला मारहाण करीत होता. तेव्हा रंगाने त्याचे मागून हात धरले होते. राजश्रीसमोर हा सर्व प्रकार सुरू होता. मात्र, तरीही तिनं यात हस्तक्षेप घेतलेला नाही. या हल्ल्यानंतर स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा आरोपी फरार झाले. पतीला रूग्णालयात नेण्याऐवजी तिनं त्याला घरी नेले. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला
अखेर राजश्रीने प्रेमप्रकरणात पती अडचण ठरत असल्यामुळे हे कृत्य केल्याचं कबूल केलं. सध्या या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पत्नीच्यां या कृत्याने संताप व्यक्त केला जात आहे.