अहिल्यानगर हादरलं ; सात वर्षाच्या मुलीवर शिक्षकाकडून अत्याचार, 4 जणानां अटक तर मुख्य आरोपी शिक्षक फरार..


पुणे : अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातून माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. जिल्हा परिषद शाळेत इयत्ता तिसरीत शिक्षण घेणाऱ्या 7 वर्षीय अल्पवयीन मुलीवर त्याच शाळेतील शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या गंभीर गुन्ह्याची तक्रार दडपण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे, तर मुख्य आरोपी शिक्षक अद्याप फरार आहे. त्याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ही घटना घडली आहे. गेल्या महिनाभरापासून शाळेच्या सुट्टीत एकटी असल्याचा फायदा घेत शिक्षकाने तिच्यावर वेळोवेळी अश्लील वर्तन करत गंभीर स्वरूपाचे अत्याचार केले आहेत. पीडित मुलगी आरडाओरड करू लागल्यावर शिक्षकांनी तिला मारहाण देखील केली आहे.संजय उत्तम फुंदे (रा. आनंदनगर पाथर्डी) असे त्या फरार शिक्षकाचे नाव आहे.

पीडित मुलीच्या पालकांनीं ही बाब आदिनाथ रामनाथ दराडे, राजेंद्र सूर्यभान दराडे, मुनवरखान सर्वरखान पठाण आणि उमर नियाज पठाण या चौघांनी सांगितली.मात्र त्यांनी तक्रार न करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला. तक्रार केल्यास गावात राहू देणार नाही, अशी धमकी देऊन त्यांनी पीडितेच्या कुटुंबाला गप्प बसवण्याचा प्रयत्न केला.या घटनेचा पर्दाफाश करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते किसन आव्हाड आणि ॲड. हरिहर गर्जे पुढे आले. त्यांना हेरंब कुलकर्णी, स्नेहालयचे गिरीश कुलकर्णी, तसेच उडान संस्थेच्या पूजा दहातोंडे आणि शाहीन शेख यांचीही मदत मिळाली. या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमुळे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तक्रार दडपणाऱ्या चार आरोपींना अटक केलीपोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या पथकाने या चौघांवर कारवाई केली आहे.

पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी पाथर्डीमधील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आली असून, वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी शिक्षक सध्या फरार असून, त्याच्या अटकेसाठी पोलिसांची पथके शोधकार्य करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!