भाजपाच्या फायरब्रँड नेत्या नवनीत राणा यांना पुन्हा जिवे मारण्याची धमकी ; पोलीस यंत्रणेचा तपास सुरू


पुणे : भाजपाच्या फायरब्रँड नेत्या नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना याआधी अनेक वेळा धमक्या देण्यात आलेल्या आहेत.त्यानंतर आता पुन्हा एकदा नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. धमकी देणाऱ्याने व्हिडिओद्वारे त्यांना धमकी दिली असून यामुळे अमरावती पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. पोलीस यंत्रणा या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भाजपाच्या नेत्या नवनीत राणा यांना अज्ञातांद्वारे धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.या धमकी देणाऱ्याने व्हिडीओ व्हायरल करुन धमकी दिली आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरु केला आहे. त्यांना आलेल्या धमक्यांमध्ये त्यांना अत्यंत खालच्या पातळीची भाषा वापरुन शिवीगाळ करण्यात आली आहे. या व्हिडीओत शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीने त्यांना अंधभक्त म्हणत जातीवादी भाषा केली तर आमच्या पेक्षा वाईट कोणी नाही अशा हिंदी भाषेत व्हिडीओ व्हायरल केला आहे.

दरम्यान नवनीत राणा यांच्यावर सोशल मीडियावर रिल्स तयार करून त्यांना गळा कापण्याची आणि जीवाने मारण्याची धमकी दिलेली आहे यात अश्लिल शिवीगाळ केल्याचे उघडकीस आले आहे. अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये नवनीत राणा यांचे स्वीय सहाय्यक विनोद गुहे यांच्याकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!