हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ या संकल्पनेची आजपासून सुरुवात, कार्यक्रमाची इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद…


बीड : बीड जिल्हा प्रशासनाच्या पुढाकारातून आणि लोकांच्या उत्स्फूर्त सहभागातून हरित बीड अभियानांतर्गत आज केवळ एका दिवसात तब्बल ३० लाख वृक्षारोपण करण्यात आले. ही अतुलनीय कामगिरी ‘इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंदवण्यात आली. या मोहिमेत विद्यार्थ्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आवर्जून सहभागी झाले. यावेळी त्यांनी वृक्षारोपणाचा आनंद घेतला.

यावेळी ते म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या ‘एक पेड माँ के नाम’ संकल्पाशी सुसंगत असा हा उपक्रम बीड जिल्ह्यात मोठ्या जल्लोषात पार पडला. वृक्षारोपण होणं हे जितकं महत्त्वाचं, तितकंच लावलेली झाडं जगवणं हे आपलं सामाजिक कर्तव्य आहे.

ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटाला तोंड देण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. दरम्यान, या उपक्रमात आकांक्षित तालुक्यांतील यशस्वी कामगिरीबद्दल प्रमाणपत्रांचं वितरण देखील करण्यात आलं. बीडमध्ये उद्योगपूरक वातावरण निर्माण करण्याच्या अनुषंगानं Centre for Invention, Innovation, Incubation and Training (CIIIT) च्या भूमिपूजनाचा कार्यक्रम सुद्धा उत्साहात पार पडला.

CIIIT सारखी केंद्रं प्रत्येक जिल्ह्यात सुरू करण्यात येणार आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून बीडसारख्या जिल्ह्यातून सात ते दहा हजार विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचं शिक्षण घेता येईल. गरजू, ग्रामीण आणि गरीब तरुण-तरुणींनी या संधीचा लाभ घ्यावा, असं आवाहन या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांनी केलं.

त्यांनी या संदर्भातील सहकार्याबद्दल टाटा टेक्नॉलॉजीचं विशेष आभार मानले. ‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ या संकल्पनेतून बीड जिल्ह्यानं आज मोठं पाऊल टाकलं आहे. आपलं महायुतीचं सरकार पर्यावरण रक्षण, शिक्षण, उद्योग आणि रोजगारनिर्मिती यासाठी कटिबद्ध आहे, असेही यावेळी अजित पवार यांनी सांगितले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!