मोठी बातमी! महाविकास आघाडीला मनसे इंजिन जोडणार? पुण्यातून आली महत्वाची बातमी समोर…


पुणे : पुण्यात मनसेच्या मदतीला महाविकास आघाडी धावून आल्याने मनसेचे इंजिन महाविकास आघाडीला जोडले जाणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. बुधवारी महापालिका आयुक्त आणि मनसेचे कार्यकर्ते यांच्यात झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे घटक पक्ष आज गुरुवारी मनसेसोबत महापालिकेत निषेध आंदोलन करणार आहेत.

बुधवारी महापालिकेत आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सुरु असलेल्या बैठकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी अचानक प्रवेश केल्याने आयुक्त नवलकिशोर राम आणि माजी नगरसेवक किशोर शिंदे यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली.

यात शिंदे थेट आयुक्तांच्या अंगावर धावून गेल्याने आयुक्तही संतापले. त्यातच आयुक्तांनी ‘बाहर जाओ’असे सांगितल्याने वादाला वेगळीच किनार मिळाली. सुमारे तीन-साडेतीन तासांच्या नाट्यानंतर पोलिसांनी शिंदे व सहकाऱ्यांना ताब्यात घेतले.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आयुक्तांची दडपशाही, राजकीय पदाधिकाऱ्यांना दिलेली अपमानास्पद वागणूक आणि मराठीचा अवमान या विरोधात गुरुवारी दुपारी एक वाजता महापालिकेबाहेर आंदोलन केले जाणार आहे.

दरम्यान, या आंदोलनात महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि समाजवादी पक्षाचे शहराध्यक्ष जांबुवंत मनोहर सहभागी होणार आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!