बापू जबाबदारी पूर्ण करत आहेत, आता जबाबदारी सभासदांची, छत्रपती कारखान्याला ‘अच्छे दिन’ येणार…!!

भवानीनगर : गेल्या काही दिवसांपूर्वी येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये पृथ्वीराज बापू जाचक यांच्या नेतृत्वाखाली पॅनलला सभासदांनी मोठा प्रतिसाद देत निवडून दिले. कारखाना अडचणीत असून तो बाहेर काढण्यासाठी आता फक्त पृथ्वीराज जाचक बापू हेच एकमेव पर्याय असल्याचे सभासदांनी दाखवून दिले.
या विश्वासाला सार्थ ठरवत पृथ्वीराज जाचक बापू यांनी कारखान्याची सूत्रे हाती घेत कारखाना पूर्वपदावर आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले आहेत. यामध्ये सर्वांना आपल्या जबाबदारीची जाणीव करून देत कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार तसेच कर्मचाऱ्यांचे कर्तव्य यावर बापूंनी ‘माझा कारखाना माझी जबाबदारी’ ही संकल्पना राबवली.
याला कर्मचाऱ्यांनी देखील मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत आपली कामे तसेच आपली कर्तव्य पार करत कारखाना पुन्हा एकदा पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी छत्रपती कारखान्याची बिकट परिस्थिती पाहता जाचक बापू यांनी कारखान्याच्या सभासदांना आवाहन करत कारखान्यात शिस्त लावली.
कामगार, अधिकारी सर्वच कारखान्याचे घटक हे वेळेवर कामावर येत असून पूर्वी विस्कटलेली घडी पुन्हा एकदा बसवली जात आहे. येणाऱ्या काळात आता सभासदांनी कारखान्याला ऊस घालून त्यांची जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन केले जात आहे. जर मोठ्या प्रमाणावर उसाचे गाळप झाले तर येणाऱ्या काही दिवसातच छत्रपती कारखान्याची घडी पुन्हा एकदा बसणार आहे.
यामुळे कारखान्याच्या कार्यक्षेत्रात जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली असून सभासदांना आपला ऊस आपल्याच कारखान्याला घालण्याचे आवाहन केले जात आहे. कारखान्याच्या कामगारांचा पगार होईल की नाही अशी परिस्थिती असताना जाचक बाप्पू यांनी कारखान्याची सूत्रे हातात घेतल्यापासून महिन्याच्या सात तारखेच्या आतच पगार होत आहे.
यामुळे कामगार देखील समाधानी आहे. तसेच पूर्वी कारखान्यात वेळेची आणि कामाची शिस्त नव्हती. आता माझा कारखाना माझी जबाबदारी या संकल्पनेमुळे कामगार देखील वेळेवर काम करत आहेत. यामुळे येणाऱ्या काळात छत्रपती कारखान्याला पूर्वीचे गतवैभव प्राप्त होईल, असा विश्वास देखील सभासदांमध्ये आहे.