आपल्या मराठी संस्कृतीला बदमान करणारे तुम्ही गुंड!! पुणे मनपा आयुक्तांनी मनसे नेत्यांना सुनावले, नेमकं काय घडलं?

पुणे : मराठी संस्कृतीला बदनाम करणारे तुम्ही गुंड आहात, अशा कडक शब्दांत पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) नेत्यांना सुनावले आहे.
तसेच महापालिकेत सुरू असलेल्या बैठकीदरम्यान मनसेचे काही कार्यकर्ते आणि नेते थेट आयुक्तांच्या दालनात गेले. या अनधिकृत प्रवेशामुळे वातावरण तणावपूर्ण झाले आणि वादाला सुरुवात झाली. आयुक्त नवल किशोर राम यांनी मनसे नेत्यांना थेट सुनावले आणि त्यांच्या वर्तनावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, या घटनेनंतर मनसेचे नेते आणि कार्यकर्ते आयुक्तांच्या दालनासमोरच आंदोलनासाठी बसले . त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध नोंदवत, आपल्या मागण्यांसाठी ठिय्या दिला आहे. त्यामुळे महापालिकेत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Views:
[jp_post_view]