पुण्यात भाजपची खेळी; शिवसेना -राष्ट्रवादीला ठेंगा देत 110 जागांवर विणलं जाळ..


पुणे : आगामी पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी 2017 प्रमाणे चार चार सदस्यीय प्रभाग रचना कायम ठेवण्यात आली आहे.या चार प्रभाग रचनेचा फायदा भाजपला होण्याची शक्यता असून इतर पक्षांना प्रभावी रणनीती आखावी लागणार आहे. या महापालिकेची प्रारुप प्रभागरचना तयार करताना भारतीय जनता पक्षाने ‘महायुती’तील राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार ) आणि शिवसेनेला (एकनाथ शिंदे) ठेंगा दाखविल्याने महायुतीत नाराजीचे वारे वाहू लागले आहेत. भाजपने आगामी निवडणुकीत स्वबळावर 110 जागा जिंकण्याचे जाळे प्रभागरचनेद्वारे विणल्याची चर्चा असून, नगरविकास विभागाचे मंत्री असलेले शिंदे हे जाळे तोडणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

राज्यातील सत्ताधारी पक्षाचा कायमच प्रभागरचनेवर वरचष्मा राहिला आहे. यंदाही त्याला अपवाद नाही. भाजपने प्रारूप रचना तयार करताना त्यांना अनुकूल असा आराखडा तयार केल्याचे समजते. आराखडा तयार करताना महायुतीत ‘राष्ट्रवादी’ आणि शिवसेना हे दोन्ही घटक पक्ष असून, त्यांना शहरातील रचनेत फारसे विश्वासात घेतले नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत थेट नाराजी व्यक्त केली आहे.

.दरम्यान भाजपने ही रचना तयार करताना स्वबळावर निवडणूक लढवली गेली, तरी 110 जागा निवडून आणण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिंदे गटाला जोरदार प्रयत्न करावे लागणार आहेत.महापालिकेने सोमवारी प्रारूप प्रभागरचना तयार करून ती नगरविकास विभागाला सादर केली आहे. नगरविकास विभाग ही रचना राज्य निवडणूक आयोगाला सादर करणार आहे. दरम्यान आगामी निवडणुकीत भाजपच वरचढ ठरणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!