उत्तराखंडमध्ये भीषण ढगफुटी ; केदारनाथ- बद्रीनाथ यात्रेसाठी गेलेले नांदेड जिल्ह्यातील 11 पर्यटक अडकले ..


पुणे : उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात काल दुपारी प्रचंड मोठी ढगफुटी झाली. या ढगफुटीनंतर मोठा पूर आला असून गावात आणि आसपासच्या परिसरात अक्षरश: विध्वंस झाला आहे. आतापर्यंत या चार जणांचा मृत्यू झाला असुन नांदेड जिल्ह्यातील अकरा भाविक अडकले आहेत. त्यांच्याशी संपर्क साधला असून ते सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे.

उत्तर काशी येथे झालेल्या ढगफुटीत नांदेड येथून दर्शनासाठी बद्रीनाथ, केदारनाथ येथे गेलेले 11 भाविक अडकले असल्याची माहिती समोर येत आहे. सर्वच भाविक नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील डोणगाव येथील रहिवासी आहेत. नांदेड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि जिल्हा प्रशासन, तसेच पालकमंत्री अतुल सावे यांनी भाविकांशी संपर्क साधून विचारपूस केली आहे. सदरील भाविक हे उत्तरकाशी येथील धराली येथून 150 किमी अंतरावर आहेत. एका जागी सात भाविक आणि दुसऱ्या ठिकाणी चार भाविक अडकले असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान या दुर्दैवी घटनेत आत्तापर्यंत चौघांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी आहेत, काही बेपत्ता आहे. ढगफुटी, पाऊस, पाणी यामुळे गावाचंही मोठं नुकसान झालं असून दुर्घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

अडकलेल्या 11 भाविकांची नावे :

1. सचिन पत्तेवार (वय 25) 2. शिवचंद्र सुकाळे (वय 30) 3. शिवा कुरे (वय 32) 4. स्वप्निल पत्तेवार (वय 25) 5. शिवा ढोबळे (वय 28)6. धनंजय ढोबळे (वय 26)7. नागनाथ मुंके (वय 28)8. देवानंद गौण्डगे वय 249. अमोल कुरे (वय 28)10. सोमनाथ चंदापुरे (वय 29)
11. देवानंद चंदापुरे (वय 27)

नांदेड जिल्ह्यातील इतर कोणी उत्तराखंड येथे अडकून पडले असल्यास त्यांच्या नातेवाईकांनी संबंधित तालुक्यातील तहसीलदाराकडे किंवा जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्र जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे (02462) 235077 या क्रमांकावर संपर्क करावा, असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!