जुन्नरचे तहसिलदार डॉ. सुनिल शेळके यांचा उत्कृष्ट ‘तहसिलदार म्हणून गौरव! पुणे जिल्ह्यात शासकीय योजनांची सर्वाधिक प्रभावीपणे राबवणूक….

उरुळीकांचन : जिल्ह्यातील उत्कृष्ट तहसीलदार म्हणून जुन्नरचे तहसीलदार डॉ. सुनील शेळके यांना सन्मानित करण्यात आले आहे. शासनाच्या महसूल विभागातील महत्त्वाकांक्षी अशा ई-फेरफार, ई-हक्क, ई-चावडी, ॲग्रीस्टॅक, पाणंद रस्ते अतिक्रमण मुक्त करणे इत्यादी प्रकल्पाचे कामकाजात पुणे जिल्हात जुन्नर तालुका अग्रस्थानी राहण्यासाठी मा जितेंद्र डूडी, जिल्हाधिकारी पुणे व मा.सुहास मापारी, अपर जिल्हाधिकारी,पुणे यांचे मार्गदर्शनाखाली नियमित व वेळोवेळी पाठपुरावा करून या विषयांत जुन्नर तालुक्याचे कामकाज पुढे नेले याचा परिपाक म्हणून ई- हक्क व ॲग्रीस्टॅक प्रकल्पाचे कामकाजात जुन्नर तालुका जिल्हात अग्रेसर असून ई-फेरफार प्रकल्पामध्ये जुन्नर तालुक्यात जिल्ह्यातील फेरफार नोंदी निर्गत करण्यासाठी लागणारा कालावधी लक्षणीयरित्या कमी करण्यात आला आहे.
नैसर्गिक अप्पत्ती , महाराजस्व अभियान , सामाजिक योजना संजय गांधी निराधार योजनेचे जवळपास ९ हजार हुन अधिक लाभार्थींचे D B T लाभ , पुरवठा विभागाचे kyc 82% काम पूर्ण , e ऑफिस , इ चावडी मध्ये अग्रेसर .तसेच, पाणंद रस्ते अतिक्रमण मुक्त करण्याचे मोहिमेमध्ये मागील सहा महिन्यात जिल्ह्यातील 70 हून अधिक रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यात आले आहेत. तर पुढील २ वर्षात तालुक्यातील सर्व अतिक्रमण झालेले रस्ते अतिक्रमण मुक्त करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या सर्व कामांमुळे नागरिकांचे जीवन सुकरमान होण्यास मदत होणार आहे. या विषयांत चांगले कामकाज केल्याने मा ना श्री अजितदादा पवार, वित्त व नियोजन मंत्री तथा पालकमंत्री, पुणे जिल्हा यांचे हस्ते चंद्रकांत पुलकुंडवार, विभागीय आयुक्त, पुणे, श्री जितेंद्र डूडी, जिल्हाधिकारी, पुणे, आमदार श्री बापूसाहेब पठारे, आमदार श्री चेतन तुपे व इतर मान्यवरांचे उपस्थितीत झालेल्या महसूल दिनाच्या कार्यक्रमात डॉ सुनील दादाभाऊ शेळके यांना पुणे जिल्ह्यातील उत्कृष्ट तहसिलदार म्हणून गौरविण्यात आले. या पूर्वी देखील तहसील कार्यालय हवेली येथे कार्यरत असताना 2018 साली पुणे विभागात उत्कृष्ठ नायब तहसीलदार म्हणजे शेळके यांना गौरविले होते.