पुरंदर विमानतळासाठी जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना मिळणार मोठं गिफ्ट, सरकारचा मोठा निर्णय…


पुणे : पुण्यातील नव्या विमानतळाचा हा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून भिजत पडला आहे. मात्र आता हा प्रकल्प मार्गी लागणार असे दिसते. कारण पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथे विकसित केल्या जाणाऱ्या विमानतळ प्रकल्पाबाबत सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

पुरंदर विमानतळ प्रकल्प हा राज्य सरकारचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. याचे काम युद्धपातळीवर व्हावे यासाठी सरकारकडून शर्तीचे प्रयत्न सुद्धा केले जात आहेत. दरम्यान आता या प्रकल्पात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना आणि जमीन मालकांना सरकारकडून मोठे गिफ्ट दिले जाणार आहे. यामुळे या भागातील शेतकरी कोट्याधीश होणार आहेत.

पुरंदर विमानतळ प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी फडणवीस सरकारकडून एक पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. सदर पॅकेजेनुसार या प्रकल्पात बाधित होणाऱ्या जमीन मालकांना एरोसिटी मध्ये विकसित करण्यात येणाऱ्या महागड्या भूखंडांपैकी एकूण जमिनीच्या दहा टक्के विकसित जमीन दिली जाणार आहे.

खरे तर एरोसिटी मधील जमिनीचा भाव हा कोटींच्या घरात आहे आणि या भागात पुरंदर विमानतळ प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांना जमीन मिळणार असल्याने तेही कोट्याधीश होणार आहेत. महत्त्वाची बाब अशी की बाधित शेतकऱ्यांना एरोसिटी मध्ये कोणत्या भागात जमीन हवी आहे यासाठी शेतकऱ्यांसोबत चर्चा केली जाणार आहे आणि त्यानंतर मग भूखंड वितरित करण्यात येणार आहे.

पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी जाहीर करण्यात आलेल्या पॅकेजुसार या प्रकल्पात बेघर होणाऱ्या सुमारे ५०० शेतकऱ्यांना २५० चौरस मीटर इतकी जागा, चारपट आर्थिक मोबदला तसेच ऐरोसिटी मध्ये जमीन मिळणार अशी माहिती प्राप्त झाली आहे.

दरम्यान, यामध्ये अल्पभूधारक जमीन मालकांना एकाच ठिकाणी जमीन उपलब्ध करून दिली जाणार असेही बोलले जात आहे आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना सामूहिक कंपनी तयार करता येऊ शकते आणि त्यांना उद्योग क्षेत्रात संधी सुद्धा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी १०० शेतकऱ्यांनी जमीन देण्यास संमती दाखवली असल्याची माहिती प्रशासनाकडून समोर आली आहे. सात गावातील शेतकऱ्यांकडून यासाठी संमती पत्र प्राप्त झाले आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!