पुणे शहरात वाहतूक विभागाचा मोठा निर्णय! शनिवार, रविवारी ‘या’ तीन प्रकारच्या वाहनांवर नवे नियम लागू…


पुणे : शहरातील रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीचा ताण कमी करण्यासाठी आणि बांधकामासाठी आवश्यक असलेल्या जड वाहनांना नियंत्रित स्वरूपात परवानगी देण्यासाठी वाहतूक विभागाकडून अवजड वाहनांच्या वाहतुकीवरील निर्बंध सशर्त शिथिल करण्यात आले आहे.

नवीन आदेशानूसार शनिवारी आणि रविवारी बांधकामाशी संबंधित वाहनांना शहरात वाहतुकीची परवानगी असणार आहे. हे नियम बांधकाम क्षेत्राशी संबंधित वाहनांपुरते मर्यादित असून, उर्वरित वाहनांवर पूर्वीप्रमाणेच बंदी कायम आहे.

हा निर्णय सध्या प्रायोगिक तत्त्वावर लागू करण्यात आला आहे. या बदलामुळे शहरातील रस्त्यांवरील गर्दी कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा वाहतूक विभागाने व्यक्त केली आहे. या नियमांचे काटेकोर पालन न केल्यास संबंधित वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.

वाहतूक उपायुक्त हिंमत जाधव यांनी जारी केलेल्या तात्पुरत्या आदेशानुसार, बांधकाम क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या डंपर, रेडी मिक्स काँक्रीट मिक्सर यांना ठराविक वेळेत शहरात प्रवेश करण्याची परवानगी दिली जाईल. मात्र जेसीबी, रोड रोलर आणि ट्रॅक्टर यांसारख्या मंदगती वाहनांवर आणि इतर सर्वसामान्य मालवाहू गाड्यांवर मात्र बंदी कायम राहणार आहे.

दरम्यान, या सवलतीमुळे बांधकाम क्षेत्रातील कामे सुकर होतील आणि रविवारी वाहतूक तुलनेने कमी असते हे लक्षात घेऊन निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. परवानगी दिलेल्या वाहनांसाठी वेळेचे विशेष बंधन घालण्यात आले आहे.

शनिवार- २ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट दरम्यान प्रत्येक शनिवारी आणि १५ ऑगस्ट या दिवशी दुपारी ४ ते रात्री १० या वेळेचा अपवाद वगळता अवजड वाहनांना शहरात प्रवेश करता येईल. रविवार – ३ ऑगस्ट ते २४ ऑगस्ट दरम्यान प्रत्येक रविवारी शहरातील रेड झोनसह संपूर्ण भागात दिवसभर अवजड वाहनांना परवानगी दिली जाणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!