माजी पंतप्रधानांचा नातू बलात्कार प्रकरणात दोषी, जन्मठेपेची शिक्षा; विशेष कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल..

नवी दिल्ली : कर्नाटकच्या बंगळुरू येथील जनता दल सेक्युलर पक्षाचे माजी खासदार आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातू प्रज्ज्वल रेवण्णा यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
न्यायालयाने त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ (२)(के) आणि ३७६ (२)(एन) अंतर्गत खटला चालवून १ ऑगस्ट रोजी दोषी ठरवलं होतं. आज, २ ऑगस्ट रोजी शिक्षा सुनावण्यात आली.
न्यायालयाने फक्त जन्मठेपेच नाही, तर १० लाख रुपयांचा दंड देखील ठोठावला असून, त्यापैकी ७ लाखांची भरपाई पीडितेला देण्याचे आदेश दिले आहेत. निकाल ऐकताच रेवण्णा भावुक झाले आणि रडू लागले, अशी माहिती न्यायालयीन माहितीदाराने दिली आहे.
प्रज्ज्वल रेवण्णा यांच्यावर आरोप होता की, त्याने स्वतःच्या घरात काम करणाऱ्या मोलकरीणेला दोनदा बलात्कार केला. पीडित महिलेने संपूर्ण प्रकाराचं व्हिडीओ चित्रीकरण केलं होतं. इतकंच नव्हे तर, घटनेवेळी अंगावर असलेली साडीही तिनं जपून ठेवली होती, जी पुढे तपासात महत्वाचा पुरावा ठरली.
दरम्यान, फॉरेन्सिक तपासात त्या साडीवर स्पर्मचे नमुने आढळल्याने प्रज्ज्वल यांच्याविरोधातील आरोप खरे ठरले. न्यायालयात सादर केलेली ही सीडी आणि साडी दोन्ही अत्यंत निर्णायक पुरावे ठरले.
प्रज्ज्वल रेवण्णा यांची पार्श्वभूमी राजकीय असून, ते माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू आहेत. १९९६ मध्ये देवेगौडा काही महिन्यांसाठी पंतप्रधान होते. प्रज्ज्वल स्वतःही माजी खासदार होते. मात्र, या गंभीर प्रकरणामुळे त्यांचा राजकीय आणि सामाजिक पत्ता थेट तुरुंगात गेला आहे.