प्रांजल खेवलकर प्रकरणावर खडसेंच्या सुनबाई आणि केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या….

पुणे : पुण्यातील खराडी परिसरातील रेव्ह पार्टीवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकरला रंगेहात पकडले. या प्रकरणावर आता सहा दिवसानंतर एकनाथ खडसे यांच्या सूनबाई आणि केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. त्यां म्हणाल्या, या सर्व गोष्टी आता न्यायालयात गेलेल्या आहेत, पोलीस सुद्धा त्याची चौकशी करत आहे, जी सत्यता आहे ती पुढे येईलच असे त्यांनी म्हटले आहे.
मागील काही दिवसांपासून रक्षा खडसे या पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात काय भूमिका घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.शेवटी रक्षा खडसे यांनी थेट भाष्य केले आहे.मी सुद्धा आज केंद्रीय मंत्री म्हणून जबाबदार पदावर आहे, त्यामुळे कोणत्याही गोष्टीची सत्यता पुढे येत नाही, तोपर्यंत मला नाही वाटत की मी त्यावर प्रतिक्रिया दिली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
रक्षा खडसे यांच्या ननंदबाई रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर न्यायालयीन कोठडीत आहेत. प्रांजल खेवलकरचा जामिनाचा अर्ज कोर्टामध्ये लवकरच दाखल होण्याची शक्यता आहे. प्रांजल खेवलकरच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह चॅट आणि काही व्हिडीओ सापडल्याची माहिती न्यायालयात पोलिसांनी दिली आहे.. त्यामुळे त्यांना जामीन मिळणार का हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.