वाद पेटणार ; ‘भगवा नव्हे तर हिंदू दहशतवाद म्हणा…..; पृथ्वीराज चव्हाणाचें वादग्रस्त वक्तव्य

पुणे : विधानसभा पराभवानंतर विजनवासात गेलेले माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण हे मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने चांगलेच चर्चेत आले आहेत.‘आरोपींना सुटका मिळावी म्हणून हे प्रकरण जाणूनबुजून कमकुवत करण्यात आले आहे. भगवा दहशतवाद ऐवजी हिंदू दहशतवाद असे म्हटले पाहिजे, असे वादग्रस्त विधान त्यांनी केल्यामुळे वाद चांगलाच पेटला आहे.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा एनआयए न्यायालयाने नुकताच निकाल जाहीर केला. २००८ मध्ये मालेगावात झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात दहशतवादाच्या आरोपाखाली अटक करून तुरुंगात पाठवण्यात आलेल्या सात जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. आरोपींविरुद्ध कोणतेही पुरावे नसल्याने त्यांना दोषी ठरवता येणार नसल्याचे न्यायालयाने म्हटले. या निकालामुळे राजकारणात खळबळ उडाली. अशातच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भगवा दहशतवाद ऐवजी हिंदू दहशतवाद असे विधान केलं. त्यांच्या या विधानामुळे अनेक हिंदूंची मने दुखावली गेली असल्याचा आरोप शिवसेनेने केला असून शिवसेना आक्रमक झाली आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यावरून शिवसैनिकांकडून त्यांच्यावर टीकेचा वर्षाव होण्यास सुरूवात झाली. तर भारतातील पहिला दहशतवादी हा नथुराम गोडसे असल्याचेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत. तसेच मला हा निकाल अपेक्षित होता,कारण तपासातून आलेले प्रतिकूल पुरावे आणि साक्षीदार यामुळे तपास अपुरा राहिल्याचे मत हे त्यांनी व्यक्त केल आहे.