सर्वात मोठी बातमी! संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार, न्यायालयाचे निरीक्षण…

बीड : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आता एक सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. यामुळे आता वाल्मीक कराडच मुख्य सूत्रधार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. यामुळे त्याला शिक्षा होण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे सांगितले जात आहे. वाल्मीक कराडबाबत न्यायालयाने आपले निरीक्षण नोंदवले आहे.
वाल्मीक कराडने आपण दोषी नसल्याचं सांगत दोष मुक्तीचा अर्ज बीड न्यायालयाकडे वकिलांच्या मार्फत सादर केला होता. याच अर्जावरती निर्णय देत न्यायालयाने काही निरीक्षणं नोंदवली आहेत वाल्मीक कराडला दोष मुक्त का करण्यात येत नाही? या संदर्भात महत्त्वाची निरीक्षणं नोंदवण्यात आली आहेत.
यामध्ये कराडबाबत गेल्या 10 वर्षात त्यांच्याविरोधात गंभीर स्वरूपाचे 7 गुन्हे दाखल आहेत. बीड जिल्हा न्यायालयात 11 प्रलंबित फौजदारी खटले समाविष्ट आहेत. वाल्मीक कराड हा गुन्हेगारी टोळीचा सदस्य असून तो घटनेचा मुख्य सूत्रधार आहे. संतोष देशमुख हे खंडणीच्या आड आले म्हणून अपहरण करून, कट रचून त्यांची हत्या केली.
तसेच वाल्मीक कराडसह टोळीवर 20 पेक्षा अधिक गुन्हे दाखल. असे नमूद करण्यात आले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, कंपन्यांना धमकावने यामुळे वाल्मीक कराडच्या विरोधामध्ये सबळ पुरावे असल्यामुळे वाल्मीक कराड हाच या घटनेचा मुख्य सूत्रधार असल्याचे आता निरीक्षणातून स्पष्ट होत आहे.
तसेच यामध्ये वाल्मीक कराड हा गुन्हेगारी टोळीचा सदस्य असून तो घटनेचा मुख्य सूत्रधार आहे. संतोष देशमुख हे खंडणीच्या आड आले म्हणून अपहरण करून, कट रचून त्यांची हत्या केली. यामुळे आता तो सुटला तर मोठा गोंधळ राज्यात होईल, यामुळे याबाबत त्याला शिक्षा करणे आवश्यक आहे.