घटस्फोटानंतर रोहिणी खडसेंनी बालपणीच्या मित्राशी लग्नगाठ बांधली, रिअल इ, स्टेटचा व्यवसाय, स्वत:ची ट्रॅव्हल कंपनी; कोण आहेत प्रांजल खेवलकर?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात काल (शनिवारी) रात्री एका फ्लॅटवर सुरु असलेली रेव्ह पार्टी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उधळून लावली. यावेळी पोलिसांकडून चार पुरुष आणि दोन महिलांना अटक केली आहे. यामध्ये एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
या रेव्ह पार्टीत कोकेन आणि गांजा या अंमली पदार्थांचे सेवन केले जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. दरम्यान प्रांजल खेवलकर कोण आहेत, याबाबतची चर्चा रंगली आहे.
या हाऊस पार्टीतून खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे. या धाडीत दोन महिला आणि पाच पुरुषांचा समावेश असल्याची माहिती आहे. ज्या रुममध्ये हा छापा टाकण्यात आला ते प्रांजल खेवलकर याच्या नावावर असल्याचं समोर आलं आहे.
प्रांजल खेवलकर हे शरद पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसेंचे जावई आणि राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेंचे दुसरे पती आहेत. पहिल्या पतीला घटस्फोट दिल्यानंतर बालपणीचा मित्र प्रांजल यांच्याशी रोहिणी खडसे यांनी विवाह केला. खेवलकर आणि खडसे कुटुंबीयांचं मुक्ताईनगरमध्ये वास्तव्यास आहेत. पत्नी रोहिणी खडसे या राजकारणात सक्रीय आहेत.
मात्र पती प्रांजल राजकारणापासून दूर आहेत. खेवलकर रिअल इस्टेट, इव्हेंट मॅनेजमेंटचे व्यावसायिक आहे. त्यांच्या नावावर साखर आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्या आहेत. याशिवाय प्रांजल यांच्या नावावर एक ट्रॅव्हल कंपनी असल्याची माहितीही समोर आली आहे.