नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी! पुढील काही तास सतर्कतेचे, राज्यातील अनेक जिल्ह्यांना हाय अलर्ट, पाऊस धो-धो बरसणार..


पुणे : राज्यभरात पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस सुरु आहे. ज्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. परंतु अनेक ठिकाणी पावसाच्या संततधारेमुळे जनजीवन आणि वाहतुकीवर मोठा प्रभाव पडला आहे.

दरम्यान, याच पार्श्वभूमीवर पुढील २४ तास देखील अनेक जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे.

तसेच मुंबई ठाण्यासह कोकण, नाशिकसह उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस बरसण्याची शक्यता आहे. या भागांमध्ये पुढील २४ तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उर्वरित जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे, अशा भागांत यलो अलर्ट देण्यात आला आहे.

कोकणात अतिमुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पालघर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड येथे ऑरेंज अलर्ट असणार आहे. यामुळे बदलत्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर मच्छिमारांनीही मासेमारीसाठी न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा जोर कायम असणार आहे. पुणे आणि सातारा या दोन्ही जिल्ह्यांतील घाट परिसर ऑन अलर्ट असणार आहे. तर कोल्हापूर आणि सांगलीमध्ये देखील मुसळधार पाऊस बसण्याचा अंदाज आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!