नाशिक हनी ट्रॅप प्रकरणात मोठी अपडेट ; 72 वरिष्ठ अधिकाऱ्यांसह डॉक्टर,व्यावसायिक अडकले


नाशिक : नाशिकमध्ये हनी ट्रॅपचं एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आल आहे.या प्रकरणात आता शहरातील ७२ वरिष्ठ अधिकाऱ्यांसह काही डॉक्टर्स आणि व्यावसायिक देखील अडकले असल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये हनी ट्रॅपची चर्चा सुरू आहे. एका मोठ्या सरकारी अधिकाऱ्याला जाळ्यात ओढून कोट्यवधी रुपयाची मागणी करण्यात आली आणि त्याच्याकडून तब्बल तीन कोटीहून अधिक रक्कम उकळण्यात आली होती. त्यानंतर आता या प्रकरणात डॉक्टर्स आणि व्यावसायिकांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून खंडणी उकळल्याचे उघडकीस आले आहे.अनेक अधिकारी, डॉक्टर आणि व्यावसायिक हनी ट्रॅपमध्ये अडकले आहेत. यातील अनेकांनी बदनामी नको म्हणून तडजोड करुन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केल्याच्या चर्चा होत आहे.

दरम्यान या प्रकरणाची व्याप्ती वाढत असताना गुप्तचर विभागाकडून गोपनीय चौकशी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. हनी ट्रॅपचा वापर करुन आदिवासी जमिनींचे काही बेकायदेशीर व्यवहार सुरु असल्याची चर्चा सुरु आहे. हनी ट्रॅपचा वापर करुन करण्यात आलेले आदिवासी जमिनींचे व्यवहार देखील गुप्तचर विभागाच्या रडारवर आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!