धक्कादायक! मुंबईतील 24 वर्षीय महिलेवर सहकाऱ्यांकडून सामूहिक अत्याचार, पाच नेपाळी तरुणांवर आरोप


मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचाराच्या घटना समोर येत असताना मुंबईची रहिवासी असलेल्या 24 वर्षीय तरुणीवर दुबईत तिच्या सहकाऱ्यांनी सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना 27 ऑक्टोबर 2024 रोजी घडली होती. याप्रकरणी पिडीतेच्या आईने वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती मात्र ती तक्रार कांदिवली पोलीस ठाण्यात पाठवण्यात आली. परंतु अद्याप एफआयर नोंदवण्यात आलेला नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की, पीडीतेची आई ही मध्यमवयीन घटस्फोटीत महिला असून आपल्या तिन्ही मुलीसह ती वर्सोवा येथेच राहते. पिडिताही तिची मोठी मुलगी आहे. पतीने त्यांना वारंवार सोडल्यानंतर परिस्थिती चांगली नसल्याने महिलेनेमोठ्या लेकीला कामासाठी दुबईला पाठवले. तिथे गेल्यानंतर सुरुवातीला एजन्टने दोन महिलांसोबत राहण्यास तिला सांगितले. त्यानंतर अबूधाबीतील एका शाखेतील किचनमध्ये तिला नोकरी लावली.पीडितेच्या आईने केलेल्या आरोपानुसार तिच्या पाच नेपाळी आणि इंडोनेशियन सहकाऱ्यांनी अबू धाबीमध्ये तिच्या खोलीत तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिच्यावर क्रूरपणे शारीरिक अत्याचार केले.

विशेष म्हणजे आरोपींमध्ये नेपाळी आणि इंडोनेशियन नागरिकांचा समावेश आहे. तरुणीवर सध्या मुंबईतील कांदिवली भागात एका रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!