पुण्यात रिक्षाची वृद्धाला जोरदार धडक; मदतीचं नाटक केलं अन…..

पुणे : पुण्यातील बालेवाडी फाट्याजवळ एका ऑटो रिक्षाने 63 वर्षीय वृद्धाला जोरदार धडक दिली आहे. यानंतर रिक्षाचालकाने मदत करण्याचे नाटक करत वृद्ध व्यक्तीला एका निर्जन परिसरात सोडून दिले. जखमी असताना उपचार न झाल्याने वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला. या प्रकरणी ऑटोरिक्षाचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गोपाळ वाघ(वय 63) असं मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. एटीएममधून पैसे काढून घरी परतताना ही घटना घडली आहे.रिक्षाचालकाने गोपाळ यांना धडक दिल्यानंतर त्यांने मदतीचे नाटक केले. आणि त्यांना निर्जन ठिकाणी सोडले. जखमी असलेल्या गोपाळ यांना वेळेत उपचार झाला नसल्याने त्यांचा मृत्यू झाला. दोन तासाहून अधिक काळ ते घरी परतले नाही तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांना त्यांची चप्पल घटनास्थळी दिसल्याचे स्थानिकांनी सांगितले.वाघ यांच्या कुटुंबीयांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केल्यानंतर तब्बल २४ तासांनंतर गोपाळ वाघ यांना मृतदेह सापडला.
दरम्यान आरोपी रिक्षाचालकाचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. जखमी व्यक्तीला सोडून देण्याच्या रिक्षाचालकाच्या निर्णयामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.