‘त्या’ लैंगिक अत्याचार प्रकरणातील शिक्षिकेचा धक्कादायक दावा ; म्हणाल्या….


मुंबई : मुंबईतील एका नामवंत शाळेत एका 40 वर्षीय शिक्षिकेने 16 वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणी आता आरोपी शिक्षिकेने नवा धक्कादायक दावा केल्याने खळबळ उडाली आहे.आरोपी शिक्षिकेने जामीनासाठी अर्ज केला होता. यावेळी आरोपी महिलेने म्हटले की, मी विद्यार्थ्यासोबत कधीही जबरदस्ती केली नव्हती. उलट तोच या संबंधात राहण्यासाठी हट्टाला पेटला होता. मी त्याला बऱ्याचदा समजावण्याचा प्रयत्नही केला होता असं विधान या शिक्षिकेने जामीन मागताना कोर्टापुढे केले आहे.

शिक्षकेने जामीन अर्जात नमूद केल्याप्रमाणे आरोपी शिक्षिकेचे विद्यार्थ्यासोबत असलेले संबंध एकतर्फी नसल्याचे निरीक्षण कोर्टाने नोंदवल आहे. तसेच शिक्षिकेची कोणतीही गुन्हेगारी वृत्तीची पार्श्वभूमी नाही तिच्याबद्दल कोणतीही तक्रार नाही.शिक्षिकेनं सादर केलेले पुरावे ग्राह्य धरत मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पोक्सो कोर्टानं शिक्षिकेला 50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. दरम्यान हा जामीन देताना कोर्टाने काही अटी लादल्या आहेत. या महिलेनं खटल्याच्या सुनावणीस नियमित हजेरी लावावी, कोर्टाच्या पूर्वपरवानगीशिवाय मुंबईबाहेर जाऊ नये, घरचा पत्ता, फोन नंबर कोर्टात जमा करावी. तसेच कोणत्याही प्रकारे संबंधित विद्यार्थ्याशी किंवा त्याच्या पालकांशी संपर्क करू नये. साक्षीपुराव्यांशी कोणतीही छेडछाड करू नये, या अटी-शर्थीद्वारे शिक्षिकेला जामीन देण्यात आला आहे. यातील एकाही अटीचा भंग झाल्यास जामीन रद्द होईल, असंही कोर्टानं स्पष्ट केलं आहे.

या प्रकरणातील 40 वर्षीय आरोपी महिला ही 11 वर्षांच्या जुळ्या मुलांची आई आहे. तिच्या मुलांची घरी काळजी घेण्यासाठी सध्या कुणीही नाही. त्यांच्या शिक्षणाचं देखील नुकसान होतं आहे , तसेच तिच्या एका मुलीला श्वसनाचा आजार असून, तिची विशेष काळजी घेण्याची गरज आहे असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!