शक्तीपीठ महामार्गासाठी 8500 हेक्टरचे भूसंपादन होणार! जिल्ह्यातून किती घेतली जाणार जमीन, जाणून घ्या….


कोल्हापूर : शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी व इतर प्रक्रियेकरिता सध्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या महामार्गाला विरोध होत असला तरी सरकार यावर ठाम आहे. शक्तीपीठ महामार्गासाठी राज्यातील एकूण 8615 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. महामार्गासाठी काही मुद्द्यांना धरून शेतकऱ्यांचा विरोध आहे.

यासाठी 8615 हेक्टर संपादन होणार आहे. यामध्ये सगळ्यात जास्त जमीन ही सोलापूर तर सर्वात कमी जमीन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहे. शक्तीपीठ महामार्ग हा राज्यातील बारा जिल्ह्यातून, 39 तालुके आणि 371 गावांच्या हद्दीतून जाणार आहे.

अजूनपर्यंत महामार्गासाठी लागणाऱ्या जमिनीची मोजणी पूर्ण झालेली नाही. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील एकूण 1689 हेक्‍टर जमीन जाणार आहे. त्या खालोखाल यवतमाळ जिल्ह्यातून 1423 हेक्टर, कोल्हापूर जिल्ह्यातून 1262 हेक्टर, परभणी जिल्ह्यातून 742 हेक्टर, सांगली जिल्ह्यातून 556 हेक्टर जमीन जाणार आहे.

तसेच नांदेड जिल्ह्यातून 387 हेक्टर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात कमी म्हणजेच 399 हेक्टर जमिनीचे संपादन होणार आहे. धाराशिव जिल्ह्यातून 461 हेक्टर, हिंगोली जिल्ह्यातून 430 हेक्टर, वर्धा जिल्ह्यातून 435 हेक्टर, लातूर जिल्ह्यातून 414 हेक्टर, बीड जिल्ह्यातून 411 हेक्टर जमीन जाणार आहे.

मोजणी पूर्ण झाल्यानंतर गटनिहाय शेतकऱ्यांची संख्या निश्चित केली जाणार आहे. हा महामार्ग वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्गमधील पत्रादेवी असे 802 किलोमीटरचा आहे. राज्यातील विदर्भ तसेच मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि गोवा राज्याशी जोडला जाणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे या महामार्गाचे काम तीन वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन असून या महामार्गाकरिता सर्वात जास्त जमीन खाजगी शेतकऱ्यांची जाणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले असून शेतकरी नेते राजू शेट्टी याबाबत आक्रमक असून तीव्र विरोध केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!