उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर आता उपराष्ट्रपतिपदासाठी महाराष्ट्रातील बड्या नेत्याचं नाव फायनल? जाणून घ्या..


वी दिल्ली : देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. प्रकृतीच्या कारणास्तव धनखड यांनी राजीनामा दिल्याची माहिती मिळत आहे. राजीनामा देताना धनखड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व मंत्र्यांचे आभार मानले आहेत. असे असताना आता नवीन उपराष्ट्रपती कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आता राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे नाव सर्वाधिक आघाडीवर आहे. याशिवाय तमिळनाडूचे राज्यपाल रवी किंवा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याही नावाचा या पदासाठी विचार होऊ शकतो, असे समजते. मात्र सगळ्यात जास्त हरिभाऊ बागडे यांचे नाव आघाडीवर आहे. धनखड यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे.

तत्काळ प्रभावाने मी हे पद सोडत आहे, असे त्यांनी यात म्हटले आहे. ‘प्रकृतीची प्राधान्याने काळजी घेण्याचा वैद्यकीय सल्ला मला देण्यात आल्याने मी उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा देत आहे. राज्यघटनेच्या कलम 67 (अ) अंतर्गत स्वेच्छेने हा निर्णय घेतला आहे,’ असेही त्यांनी राष्ट्रपतींना उद्देशून लिहिले आहे. याबाबत माहिती अशी की, धनखड यांना दिलेल्या वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांना उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला आहे.

याबाबत ते म्हणाले, माझ्या कार्यकाळात आमच्यात असलेल्या आनंददायी आणि अद्भुत कामकाजाच्या संबंधांबद्दल मी भारताच्या माननीय राष्ट्रपतींचे मनापासून आभार मानतो. अचानक जगदीप धनखड यांना राजीनामा दिल्यामुळं राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु आहेत. संसदेच्या सर्व सदस्यांकडून मला मिळालेले प्रेम आणि विश्वास नेहमीच माझ्या आठवणीत राहील, असेही त्यांनी म्हटले आहे.

देशाच्या महान लोकशाहीत उपराष्ट्रपती म्हणून मला अनेक अनुभव मिळाले यासाठी मी मनापासून आभारी आहे. देशाच्या आर्थिक प्रगतीचा आणि अभूतपूर्व विकासाचे साक्षीदार होणे आणि त्यात सहभागी असणे ही समाधानाची बाब आहे, असेही धनखड म्हणाले. आता नवीन नियुक्ती कोणाची होणार हे लवकरच समजेल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!