प्रविण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी निषेध

लोणी काळभोर : संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे झालेला हल्ला व जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात पुर्व हवेलीतील राजकीय पक्ष व संघटनांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी संघटनांनी हवेली तालुक्यातील लोणी स्टेशन ते लोणी काळभोर पोलीस ठाण्यापर्यंत शांततापुर्ण पध्दतीने पायी लॉन्गमार्च काढला.
पुर्व हवेलीतील संघटनांनी प्रविण गायकवाड यांच्यावर हल्ला करणारे दीपक काटे यांच्यावर पोलीस प्रशासनाकडून कडक कारवाई करावी. तसेच जनसुरक्षा कायदा कलम 13, 14, 19 अणि 21 याचे उल्लंघन करणारा असल्यामुळे सदर कायदा हा त्वरित रद्द करण्यात यावा.
पोलीस प्रशासन व सरकारने घटनेतील न्याय, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक समतेच्या मूल्यांचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करावे. अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. संघटनाच्या वतीने मागणीचे निवेदन लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांना देण्यात आले.
यावेळी सूर्यकांत गवळी, श्रीकांत होवाळ, हनीफ शेख, ॲड. श्रीकांत भिसे, बाळासाहेब आवारे, अमोल लोंढे, संदीप शेलार, गणेश तौर, महेश जैनजांगडे, दत्ता कांबळे, संदीप बडेकर, ॲड.अनिता गवळी, अनिता गोरे, महेश गायकवाड, अक्षय म्हस्के, अमर भोसले, संजय वाघमारे, आबासाहेब जवळकर, गिरीश चंद, लक्ष्मण चव्हाण, संतोष आडळे, अभिजित पाचकुडवे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.