विधानभवनात गुंडगिरी करणारा पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले निघाला गुंड! महिलेचा विनयभंग, हल्ला, अपहरण अनेक गुन्हे दाखल..


मुंबई : काल संध्याकाळी भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ भिडले. त्यांच्यात जोरदार हाणामारी झाली आणि त्यात एकमेकांचे कपडेही फाडण्यात आले. यामुळे राज्यातून यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

असे असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा कट्टर समर्थक असलेल्या कार्यकर्त्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना विधानभवनाच्या दारात मारहाण केली. यामुळे टकलेचं नाव चर्चेत आलं आहे. यामुळे ऋषिकेश ऊर्फ सर्जेराव टकले याचे नाव समोर आले आहे.

ऋषिकेश टकले हा गोपीचंद पडळकर यांच्यासोबत सतत दिसतो. मतदारसंघातील दौरे, सभा, अधिवेशन टकले हमखास त्यांच्या सोबत असतो. त्याच्यावर महिलेचा विनयभंग, मारहाणी, शासकीय कामात अडथळा, प्राणघातक हल्ला, अपहरण, अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांखाली नोंदवले गेले आहेत.

यामुळे त्याची चौकशीची मागणी केली जात आहे. एवढ्या गंभीर गुन्ह्यांचा आरोपी असलेला व्यक्ती राजकीय कार्यक्रमांमध्ये, तेही विधानभवनात, इतक्या सहजपणे फिरत असेल, तर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यामुळे परिस्थिती भयंकर बनली आहे. आमदार गोपीचंद पडळकर देखील अनेकदा खालच्या पातळीवर बोलताना दिसून येत आहेत.

दरम्यान, पडळकरांचा कार्यकर्ता मकोकाचा आरोपी आहे. त्याचा हेतूच आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करण्याचा होता.” मकोका हा गंभीर गुन्हेगारी पद्धतीच्या टोळीविरोधातील कायदा आहे. त्यामुळे या आरोपात जर तथ्य असेल, तर टकलेविरोधात कारवाई टाळणे सरकारसाठीही धोकादायक ठरू शकते. असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!