आनंदाची बातमी! 1 जुलैपासून LPG सिलेंडर स्वस्त, जाणून घ्या नवे दर..

पुणे : व्यावसायिक गॅस वापरणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. १ जुलैपासून व्यावसायिक LPG गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये तब्बल ६० रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे. मात्र, घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
तसेच देशभरात १४ किलो घरगुती एलपीजी सिलेंडर वापरणाऱ्यांसाठी जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी कोणतीही किंमत कपात झाली नाही. जून महिन्यातही घरगुती दरात स्थैर्य होते आणि जुलैमध्येही तेच दर कायम राहणार आहेत. यामुळे गृहिणींसाठी अपेक्षित दिलासा अद्यापही मिळालेला नाही.
तसेच तेल विपणन कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात कपात केली असून, आजपासून नवे दर लागू झाले आहेत. ‘
काही शहरांतील अद्ययावत दर पुढीलप्रमाणे..
दिल्ली – ₹1723.50 वरून ₹1665
मुंबई – ₹1674.50 वरून ₹1616.50
चेन्नई -₹1881 वरून ₹1823.50
दरम्यान,यामुळे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, ढाबे व इतर व्यावसायिकांना मोठा फायदा होणार आहे. परिचालन खर्च कमी झाल्याने सेवा दर्जाही सुधारेल, अशी अपेक्षा आहे.